Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

कलमाडींच्या विरोधात भाजपची निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, April 27, 2011 AT 01:30 AM (IST)

पुणे - 'सुरेश कलमाडी यांना खासदारपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांना कॉंग्रेस पक्षानेही निलंबित केले आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने खासदारपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा भारतीय जनता पक्ष आंदोलन करेल,'' असा इशारा नगरसेवक विकास मठकरी यांनी मंगळवारी दिला.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भ्रष्टाचाराच्या आरोपात केंद्रीय अन्वेषण विभागाने कलमाडी यांना सोमवारी अटक केली. कलमाडी यांच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आज सकाळी डेक्कन जिमखाना येथील गोखले चौकात निदर्शने केली. "भ्रष्टाचारी कलमाडी हटाओ..', "पुणे बचाओ..', "देश बचाओ', "पुण्यनगरीच्या नावाला कलंक असणाऱ्या कलमाडीने राजीनामा दिलाच पाहिजे', "कलमाडी मुर्दाबाद!', "कलमाडीचे करायचे काय?'.. "खाली डोके वर पाय!' अशा घोषणा या कार्यकर्त्यांनी दिल्या.

मठकरी म्हणाले, ""पुण्यासारख्या ऐतिहासिक शहराच्या आजवरच्या लौकिकाला कलमाडी यांनी काळिमा फासला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. कॉंग्रेसनेही त्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे खासदारपदावर राहण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. त्यांनी राजीनामा न दिल्यास भाजप तीव्र आंदोलन करेल.''


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: