Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

न्यायालयातील याचिकेमुळे कृत्रिम पाऊस लांबणार?
-
Wednesday, June 16, 2010 AT 12:23 AM (IST)

मुंबई - राज्याच्या ग्रामीण भागात विमानांद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठीच्या निविदा प्रक्रियांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मात्र, या प्रश्‍नी न्यायालयाने हस्तक्षेप केल्यास या वर्षी हा प्रयोग करता येणार नाही, अशी भीती "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी'तर्फे न्यायालयात व्यक्त करण्यात आली.

राज्यात असा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी इन्स्टिट्यूटने निविदा मागविल्या होत्या. या प्रयोगाला कर्नाटक व आंध्र प्रदेशनेही सहकार्य केले आहे. तांत्रिक व आर्थिक असे निविदांचे दोन भाग होते. इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञ समितीने कृषी कन्सल्टन्सीची तांत्रिक निविदा पात्र ठरविली; तर अग्नी एरोस्पेस ऍडव्हेंचर अकादमीची (आसा) तांत्रिक निविदा अपात्र ठरविली. या निर्णयास "आसा'ने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याचिकेची सुनावणी आज झाली. या प्रयोगासाठी अमेरिकेहून दोन विमाने मागविली जाणार आहेत, त्याखेरीज डॉप्लर रडार, तंत्रज्ञ-शास्त्रज्ञ आदींचीही गरज लागणार आहे. हा प्रयोग करणाऱ्यांनी उपग्रहाच्या साह्याने पावसाळी ढगांची माहिती मिळविणेही अपेक्षित आहे. पावसाळी ढगांवर फवारण्यासाठी विमानात किमान एक टन बियाणे-इंधन असणेही गरजेचे आहे. मात्र, कृषी कन्सल्टन्सी यापैकी अनेक बाबतीत अपात्र असूनही त्यांना पात्र ठरविण्यात आले. दुसऱ्या फेरीत आमच्या रडारच्या निकषांना पात्र ठरविण्यात आले. मात्र, आम्ही रडारचे तांत्रिक निकष बदलले नसतानाही तिसऱ्या फेरीत रडारच्याच मुद्द्यावरून आम्हाला अपात्र ठरविण्यात आले. यावरून तज्ज्ञ समितीचा आमच्याबद्दलचा पूर्वग्रह दिसतो, असे "आसा'तर्फे आज सांगण्यात आले.

तर तांत्रिक निविदा पात्र ठरविलेल्या कृषी कन्सल्टन्सीला या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले नाही, यावर इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीतर्फे भर देण्यात आला. "आसा'च्या विमानांमध्ये पुरेशी बियाणे-इंधन क्षमता नव्हती, असेही त्यांनी दाखवून दिले. मुख्य म्हणजे तांत्रिक निविदा स्वीकारण्याचा-फेटाळण्याचा निर्णय तज्ज्ञांच्या तांत्रिक समितीने घेतला आहे. हा निर्णय तज्ज्ञांचा असून त्यांच्याकडे या विषयावर असलेले तांत्रिक ज्ञान न्यायालयाकडे आहे का, तज्ज्ञ समितीचे मत फेटाळून लावण्यासाठीचे ज्ञान न्यायालयाकडे आहे का, हे काम न्यायालय कसे करणार, असे प्रश्‍नही इन्स्टिट्यूटतर्फे उपस्थित करण्यात आले. तसेच आता पावसाळा सुरू झाल्याने हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी तो लगेच सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रश्‍नात न्यायालयाने हस्तक्षेप केल्यास तो प्रयोग लांबेल व त्याची यशस्वीताही कमी होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
प्रतिक्रिया
On 6/16/2010 5:33 AM sameer said:
bail geal ani zopa kela ase hoil , Nayalayachi bumika kathor pahije ahe --lagech cahukashi karun nirnay dila pahije-- nanatar Krutrim paus padun kay upyog? Nyaya dilyach smadhan -- Nayalay murkh ahe !
On 6/16/2010 5:26 AM Raja Marathe said:
In case the courts do intervene, the Indian people can try another option of Varunyantra. Please visit our website http://varunyantra.org for more information. Raja Marathe


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: