Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

कोयना अभयारण्यात बेसुमार वृक्षतोड (व्हिडिओ)
सकाळ वृत्तसेवा
Sunday, April 18, 2010 AT 12:00 AM (IST)

शैलेन्द्र पाटील
सातारा - लाल मातीच्या फुफाट्यातून जाणारी अरुंद डोंगरवाट..., उभ्या चढणाचे कच्चे रस्ते..., त्यातून घरघर आवाज करत परिसरातील शांततेचा भंग करणाऱ्या ट्रकची ये-जा..., कडाडा कोसळणारे डेरेदार वृक्ष..., लहान-मोठे ओंडके भरण्यासाठी लोकांची लगबग.... हे दृश्‍य कोयनानगरच्या दक्षिणेकडील परिसरात पाहायला मिळत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अभयारण्याच्या दहा किलोमीटर क्षेत्रात वृक्षतोडीस पूर्णपणे बंदी असताना वृक्षतोड करणाऱ्या टोळ्यांनी कुऱ्हाड व जेसीबी चालवून अक्षरश: डोंगर ओरबाडून काढलेत. वन्य प्राण्यांच्या स्थलांतर क्षेत्रातच (कॉरिडॉर) ही वृक्षतोड सुरू असल्याने, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वन्य जीव धोक्‍यात आले आहेत. चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्य क्षेत्राचा समावेश असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना जानेवारीत जारी झाली. हा प्रकल्प पश्‍चिम महाराष्ट्रातील व पश्‍चिम घाटावरील पहिला व राज्यातील सर्वांत मोठा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे. वाघ, त्यांचे भक्ष्य, त्यांचा परिसर व सहशिकारी वन्य प्राणी या सर्वांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी व्याघ्र प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी झालेल्या वन्य जीव गणनेत अंतिमतः कोयनेत दोन, तर चांदोलीत तीन वाघांच्या रहिवासावर शासकीय मान्यतेची मोहर उमटली.

जैवविविधतेने संपन्न असलेल्या अभयारण्यातील वन्य जीव, नरक्‍या व इतर वनौषधी वनस्पतींबरोबरच दुर्गम भागातील मुबलक वनराईकडे काही अवैध व्यावसायिकांनी पाटण तालुक्‍याकडे लक्ष वळविले आहे. कोयना अभयारण्य क्षेत्रात वृक्षतोड करणाऱ्या धनदांडग्यांच्या बेलगाम टोळ्यांनी नैसर्गिक वनराईने बहरलेली सह्याद्रीची रांग बोडकी करण्यास सुरवात केली आहे. या धनदांडग्यांनी स्थानिकांना रोजगाराचे आमिष दाखवत वृक्ष तोडून फोडलेल्या लाकडांचे ट्रक पळविण्याचे उद्योग चालवले आहेत. कोयनानगरच्या दक्षिणेस रिसवड, कोंडावळे गावानजीक डोंगरउतारावरील खासगी क्षेत्रात "जेसीबी'ने रस्ते केल्याचे पाहावयास मिळतात. केलेल्या वृक्षतोडीचे लाकूड वाहनातून सहजगत्या नेण्यासाठीच हे रस्ते बनवण्यात आले आहेत. पाटण खोऱ्यात या रस्त्यांना "तोडीचा रस्ता' असे संबोधले जाते, ते याच कारणामुळे!


कोयनानगरजवळ वाढत्या वृक्षतोडीचे प्रकार सुरू असतानाच या धनदांडग्यांनी आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात शिरण्याचे धाडस केले आहे. मुळातच अभयारण्याच्या दहा किलोमीटर (हवाई अंतर) क्षेत्रात वृक्षतोडीस पूर्णपणे बंदी असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. कोंडावळे व रिसवड ही गावे कोयना व चांदोली या दोन्हीच्या दहा किलोमीटर क्षेत्राच्या आतील गावे असल्याने, त्यांचा यावर तीव्र आक्षेप आहे. कोयना व चांदोलीदरम्यान वन्य जीवांना सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी धानकल ते नेचल या गावांदरम्यान "कॉरिडॉर' राखून ठेवण्यात आला आहे. कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यान यांना जोडणारा हा वन्य जीवांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील भाग आहे. वाघ सतत वावर बदलत असल्याने या हरितपट्ट्यातून त्यांचे स्थलांतर होत असते. मात्र, ते राखून ठेवलेल्या "कॉरिडॉर'मधूनच स्थलांतर करतील, हे सांगता येत नाही. या "कॉरिडॉर'लगतच कोंडावळे व रिसवड (ता. पाटण, सातारा) ही गावे असल्याने, या गावांलगतच्या खासगी वन क्षेत्रातूनही ते वावरू शकतात. या ठिकाणीच ही बेसुमार वृक्षतोड होत असल्याने, "कॉरिडॉर' धोक्‍यात येऊन व्याघ्र प्रकल्पाला धोका निर्माण झाला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची नुकतीच अधिसूचना निघाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या बेसुमार वृक्षतोडीस परवानगी कोणी व कशी दिली, हा प्रश्‍नच आहे. याकडे वन व वन्यजीव विभागाचा काणाडोळा होतो आहे, हे मात्र निश्‍चित!

प्रतिक्रिया
On 4/19/2010 8:40 PM charu said:
हि वृक्षतोड अभयारण्यातली तर आहेच , शिवाय,परिसरात,जयगड,भैरवगड,प्रचीतगड,वासोटा,चकदेव,पर्वत असे अनेक किल्ले आहेत.या किल्ल्यांच्याही अस्तित्वाला,इतिहासाला ह्या वृक्षतोडीमुळे धोका आहे.म्हणजे,मानवाची हाव,आता निसर्गातील घटक आणि मानवी संस्कृती आणि इतिहास यांनाही संपवणार आहे.
On 4/19/2010 7:22 PM charu said:
मानवी हाव -हि न संपणारी आहे.ह्यांना काहीही पुरणार नाही. पुण्यात पद्मावती जवळ वड,पिंपळ इत्यादी झाडे लावली आहेत, खरेच ह्या झाडांना काही भवितव्य आहे का? तसेच,सिंहगड रस्त्यावर मध्ये लावलेली झाडे आता मोठी झाली आहेत,पण रस्ता रुंदीकरणाच्या नाटकात ह्यांना काय भविष्य आहे?भाजीवाले,rickshaw वाले, पार्किंग, हि नाटके असल्यावर झाडांना कोण विचारतो?
On 4/19/2010 5:43 PM mk said:
इथे मूळ प्रश्नाचा शोध घेणे आवश्यक आहे. लोक झाडे का तोडत आहेत १) उदार निर्वाह साठी २) उद्योग म्हणून ३) तस्करी वगैरे... त्यातून काही मार्ग काढावा लागेल ते पण लवकर नाही तर, कोयने चा परिसरचे vaalvant व्हायला वेळ लागणार नाही... दोषी लोकांना जास्तीजास्त शिक्षा द्यावी ज्याने बाकी चे लोकांना भीती वाटली पाहिजे..
On 4/19/2010 5:14 PM Green Lover said:
Sakal should start a campaign against rapid deforestation happening in western ghat and other places in Maharashtra. We will give them support and bring the culprits to justice.
On 4/19/2010 5:13 PM Green Lover said:
All those who are interested please unite and form a group and take up this issue to Green Peace (www.greenpeace.org/india) first. Then with the help of green peace take up this to Environment Minister Jairam Ramesh and bring pressure to local goverment. Please act now or else all forest in western ghat will be wiped out by these evil govt. officers and wood mafia. Please please save the forest and environment. Please start a group on Facebook or Orkut and act now. Save forest and save our life.
On 4/19/2010 5:10 PM mi said:
स्थानिक लोकांना वनसंरक्षक म्हणून नोकर्या द्या. आणि त्यांच्या गावाच्या आसपास झाडे तोडलेली आढळली, तर तुरुंगात टाका.
On 4/19/2010 4:06 PM asif kurane said:
forest khat kay zopa kadtay kay? atta kaltay mazya gavatla forest inspector 4 varshat lakpati kasa zala
On 4/19/2010 3:40 PM Yogesh said:
Cut the hands and legs of the people who are active in this Tree cutting business. Local politians are involved and government should take serious steps on this. Western Ghats will be no sooner looks green and the temp. will rise to 50 deg. soon making it difficult for wild animals as well as us.
On 4/19/2010 3:12 PM अतुल जोशी said:
मी ४/५ महिन्यांपूर्वी आंबा घाट,कोयनानगर,चांदोली येथे भटकंती केली होती.तेथील भयानक वृक्षतोड बघून मन खूप दुखी झाले.....कोकण आणि घाट म्ठ्याच्या या परिसरात फारच गंभीर परिस्थिती आहे.याला वेळीच आवर नाही घातला तर माणसांची कातडी जळण्यास फार वेळ शिल्लक नाही....शासकीय आशीर्वादाशिवाय हि कामे होणं शक्य नाही...स्वार्थी राजकारण सोडून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जालीम तोडगा काढा .....काळाची पावले ओळखा...नाही तर विनाश अटळ आहे.
On 4/19/2010 1:20 PM Ek Vanapremi said:
अरेय नालायक वन अधिकार्यानो तुम्ही डोळे असून आंधळे आणि कान असून बहिरे आहात. हा हरामचा पैसा तुमच्या आयुष्याला पुरणार नाहीये. तुमच्या बरोबर तुमची पुढची पिढी देखील ह्या सगळ्याचे दुष्परिणाम भोगल्या शिवाय मरणार नाही. देव करो आणि तुम्हाला नरकात देखील जागा न मिलो.
On 4/19/2010 1:02 PM ak said:
मी जेव्हा २००८ व २००९ माघे बाईक वारू गणपती पुले ला जावून आलो तेव्हा चे दृश आणि २०१० मध्ये जावून आलो यामध्ये जमीन आस्मानच फरक आहे स्थानिक लोक खूप म्हणजे बरीच तोड करतात मी पहिल्यांदा गेलो तेव्हा खूप झाडी होती पण शेवटच्या वेळेला गेलो तेव्हा सर्व दृश बदलले होते कृपया सरकारला माझी कलकलून विनंती आहे सर्व काही थांबवा
On 4/19/2010 12:59 PM VILAS said:
सकाळने एवढे चांगले काम केले आहे. जे अधिकारी ह्या प्रकारामध्ये आहेत त्यांना चांगली सबक शिकवावी हि विनंती आहे. thanks सकाळ
On 4/19/2010 11:13 AM anand said:
Cut the hands and legs of the people who are active in this Tree cutting business. Local politians are involved and government should take serious steps on this. Western Ghats will be no sooner looks green and the temp. will rise to 50 deg. soon making it difficult for wild animals as well as us.
On 4/19/2010 10:56 AM shriram Mishra said:
अहो अशीच जंगलतोड शाहुवाडी तालुकाय्तील सोन्दोली, थावडे, शिरले, शितूर मध्ये झाली आहे, आणि याला जबाबदार तेथील अधिकारी आहेत, कारण अधिकार्याच्या घरातच सागाची झाडे मिळून येतील. कृपया सकाळने आवाज उठवावा.
On 4/19/2010 10:55 AM dhiraj mohite said:
Mr.Rahul we have to think on the bottom cause for doing such activities by people, this shows how government failure in the management of below subjects 1) Employment 2)Awareness 3) Edjucation Because the views of people in our villages is not changed as mentioned three factors are absent, so everybody has to contribute for this in their own way if not government.
On 4/19/2010 10:37 AM purushottam dixit said:
२००७ मधे मी जंगली जयगड या कोयनानगर जवळच्या किल्ल्यावर गेलो होतो तेव्हा वृक्षतोडिचे हे भयानक दृश्या प्रथम पाहीले होते. त्या नंतर खेड येथील महिमंडण्गड-रघुवीर घाट-चोरवणे या परिसरात मोठ्या प्रकारे वृक्षतोड चालू असल्याचे पाहीले, यामधे तिथल्या स्थानीक लोकांचाच मोठ्याप्रमाणावर हात असतो.
On 4/19/2010 10:15 AM Punekar said:
भयानक प्रकार चालू आहेत. पर्यावरणाचा र्हास, ग्लोबल वार्मिंग वगैरे शब्द ह्या लोकांना समजत नसतील किंवा पैशाच्या पडदा कानावर असल्यामुळे ते ऐकू जात नसतील तर ह्यावर जबर शिक्षा हाच उपाय आहे आणि तो अमलात आणला पाहिजे नाहीतर dayansoras प्रमाणे वाघाच्या गोष्टी च उरतील. सरकारने पावले उचलावीत (अगदी दिल्लीच्या विरोधात जावे लागले तरी) नाहीतर तापमान पुणे ४८ आणि नागपूर ५२ असेच नोंदवावे लागेल. साधारण पणे माणसे ह्या तापमानात मरू शकतात हे येथे ध्यानात घ्यावे लागेल.
On 4/19/2010 9:42 AM rahul said:
ह्या लोकांचे हात पाय लगेच तोडा
On 19/04/2010 08:36 Suunil said:
पर्यावरणावर ह्या सर्व गोष्टींचा दुष्परिणाम होतो हे जगजाहीर आहे. पण राजकीय आश्रयामुळे आणि पैशाच्या लोभापायी अशी जंगल तोड सहज शक्य आहे. ह्या मधून जे काही उत्पन्न मिळणार आहे ते सर्व ह्या पिढीत तर संपणार नाही तर भावी पिढीला पण देणार आहात. पण जो प्राणवायू आणि वाढलेले तापमान हे त्या बरोबर फुकट देणार आहात ह्याची पण जाणीव हवी.
On 4/19/2010 8:27 AM K. DUKARE said:
To whom we can hold responsible? If I want to ask question to minister, how I can do it?
On 4/19/2010 8:20 AM K. DUKARE said:
Why Goverment is not seriouse on these issues. Years after years natural balance is getting affected. Gove should impose strict actions on such things. Please act so that next generation will servive. Goverment should work out plan to increase the numberof trees per square meter index. we should increase this index by four times with in nex 5years.
On 19/04/2010 8:08 AM vasant chavan said:
लोकांनी पंतप्रधान आणि सोनिया गांधीना पत्र लिहा मी पण पत्र लिहिले आहे आणि याच्यात जंगल अधिकारी सुधा मिळाले आहेत
On 4/19/2010 7:51 AM allakh said:
its all because of dirty politics in this region. no one has the guts to stop this. it will go on till all is doomed....
On 4/19/2010 7:38 AM mahadeo said:
याला सर्वस्वी राज्यकर्ते जबाबदार आहेत स्वताच्या फायद्यासाठी हि नालायक मंडळी गुन्हेगारांना पाठीशी घातल्याचे हे परिणाम आहेत प्रत्येक क्षेत्रात हीच बोंब आहे
On 4/19/2010 6:05 AM Girish Lakhe said:
जंगल तोड थांबली पाहिजे. झाडे जगली नाही तर पर्यावरणाचा ऱ्हास होईल आणि संपूर्ण मानव जातीला याची किंमत मोजावी लागेल. सरकारने जनते मध्ये याची जाणीव निर्माण केली पाहिजे तसेच सेवाभावी संघटनांनी जनजागृती करण्यात हातभार लावला पाहिजे
On 4/19/2010 5:44 AM monal said:
send this report to mr patangrao kadam lets see what action he takes or not
On 4/19/2010 5:32 AM marathi said:
कायद्यात खालील तरतूद करावी, एक वृक्ष तोडला तर तोडनारयाची मान (डोके) कापावी, दोन तोडले तर एक कात कापावा. तीन तोडले तर दोन हाथ कापावे, आणि नंतर मृतुदंड द्यावा..
On 19/04/2010 3:45 AM vasant chavan said:
झाडे तोडा आणि स्वताच्या पायावर दगड मारून घ्या ४५ डिग्री उन काही कमी पडत आहे का झाडांना वाचवा व स्वताला पण वाचवा
On 4/19/2010 2:17 AM sandeep said:
भयंकर ! संस्कृतीच्या नाशाचे आणखी एक चिन्ह !... देहांत शिक्षा खूप लहान आहे !
On 4/19/2010 2:13 AM Rani said:
continued..... डीवायडर झाडे लावली आहेत पण ती सावली देतात का? अशी किती झाडे आहेत? पुढे जंगल फक्त पुस्तके, विडिओमध्ये बघायला मिळतील. पाऊस कमी. उष्णता जास्त, वादळे भूकंप यांचे प्रमाण वाढणे.... श्रीमंत लोक बसतात ए सी मध्ये. सरकार ने आणि विविध संस्थांनी काही तरी करायला हवे. मी सकाळ चे मनापासून आभार मानते कि त्यांनी जागृती करण्याचा प्रयत्न तरी केला. कारण पुण्या मुंबई मध्ये राहून कोयने मध्ये काय चालले आहे हे कळणार नाही. कायदा कडक करून या लोकांना शिक्षा व्हायला हवी. काही तरी हालचाल व्हायलाच हवी.
On 19/04/2010 02:11 old bloke said:
gr8 work esakal. this is eye opener for us. We should protest against it.
On 4/19/2010 2:01 AM Rani said:
फारच दुखद बातमी आहे. वृक्ष तोड करणार्यांनी एवढा तरी विचार करावा कि आपल्या वृक्ष तोद्ण्याने आपणच पुढच्या पिढी साठी संकटे उभी करत आहोत. पुढच्या पिढीचे आयुष्य कमी करत आहोत. आताच्या घडी ला उन्हाने लोक मरत आहेत. हे केवळ वृक्ष तोद्ण्याने झाले आहे. करतात एक आणि भारतात अनेक अशी गत जाली आहे. रस्ता रुंदीकरण च्या निमित्ताने जी वृक्ष तोड झाली कोणी भरून काढली आहे का? बेंगलोर - मुंबई हायवे पूर्ण झाडांच्या सावली मध्ये होता. आता नुसता भकास झाला आहे. continued....
On 19.04.2010 01:48 WaWi said:
यावर काही इलाज नाही का? झाडे तोडल्यानंतर वाघ गावात आले आणि लोकांना त्रास झाला कि वाघही मारणार का?


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: